श्रीराम मंदिर भूमीपुजन सोहळ्याचा जतेत आंनदोत्सव

0



जत,प्रतिनिधी : आयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपुजन सोहळ्याचा जत भाजपतर्फे हनुमान मदिंरासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.तालुक्यातील अनेक गावात भूमीपुजन होताच फटाक्याची आतषबाजी करून आंंनदोत्सव साजरा करण्यात आला.

… ‘राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे…सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाव वरानने’ तनाने जरी लोक जतेत असले तरी मनाने ते कधीच शरयूकिनारी असलेल्या अयोध्येला पोहोचले होते. अखेर तो मुहूर्त आला अन् असंख्य नागपूरकरांच्या डोळ्यात विलक्षण समाधानाचे आनंदाश्रू तरळले.



ईश्वरीय अनुभूती देणाऱ्या ‘रामधून’चे सकाळपासूनच गुंजणारे स्वर, चौकाचौकात मर्यादा पुरुषोत्तमाची प्रतिमा, कुठे डोळ्यांना विलक्षण अनुभव देणारे रांगोळीचे सौंदर्य तर कुठे जणू सणच असल्याचा भास करवून देणारी रोषणाई. चौकात राम, घरात राम इतकेच काय तर मनामनात देखील रामच राम. आबालवृद्धांच्या तोंडी स्तोत्र… ‘राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे…सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाव वरानने’ तनाने जरी लोक नागपुरात असले तरी मनाने ते कधीच शरयूकिनारी असलेल्या अयोध्येला पोहोचले होते. 



अखेर तो मुहूर्त आला अन् असंख्य जतकरांच्या डोळ्यात विलक्षण समाधानाचे आनंदाश्रू तरळले.रामधून वादन करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी उत्साही नागरिकांनी मिठाईचे देखील वाटप केले.मर्यादेचे पालन ; श्रीरामाची ओळख मर्यादा पुरुषोत्तम अशीच आहे. अशा आराध्य देवतेच्या मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी रामभक्त तसेच नागरिकांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या मर्यादेचे पालन केले. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. घरोघरी भगवे ध्वज लावण्यात आले होते व सायंकाळच्या वेळी घरांसमोर दिवे देखील लावण्यात आले.आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Rate Card



जत शहरातील या सोहळ्यात माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार,नगरसेवक उमेश सांवत,संतोष मोटे आदी पदाधिकाऱ्यासह राष्ट्रीय स्वंयसेवक संघ,शिवसेना,श्रीराम प्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते.



जत येथे श्रीराम मंदिर भूमीपुजन सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.