डफळापूरतील ‘ई’निविदा न काढताच सुरू असलेले रस्ते काम अखेर रद्द

0डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील पाटबंधारे ऑफिस – गुरूबसू माळी ते काळेशिवार रस्त्याचे ‘ई’ निविदा न काढता सुरू असलेले काम अखेर ग्रामपंचायतीने रद्द केल्याची माहिती बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण यांनी दिली.सागर चव्हाण म्हणाले,ग्रामपंचायती कडून 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून शेतमाल ने-आण करणेच्या सुविधासाठी म्हणून पाटबंधारे ऑफिस – गुरूबसू माळी ते काळेशिवार या रस्त्याचे काम करण्याचा ठराव  घेतला होता.4 लाख 68 हजार 225 रुपयांच्या या कामांची ‘ई’ निविदा व रितसर कामाची वर्क ऑर्डर न घेताच मनमानी करत सुरू करण्यात आले होते.


Rate Card

ते कोणत्या नियमात बसते.याबाबत आम्ही गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.त्यानुसार ग्रामपंचायतीकडून हे काम रद्द करण्यात आले,असून या निधीतून अन्य विकास काम करण्यात येणार असल्याचा ठराव घेतल्याचे पत्र आम्हाला ग्रामपंचायतीने दिले असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.शासनाच्या निधीचा गैरवापर करून कोणतीही कामे विना परवाना घुसडण्याचा प्रकार यापुढे सहन करणार नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.