लोकनेते राजारामबापू पाटील,लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
संख,वार्ताहर : संख(ता.जत) येथील श्री. निलांबिका बसवेश्वर शिक्षण संचलित राजारामबापू पाटील माध्यमिक जुनिअर कॉलेज संख येथे लोकनेते राजारामबापू पाटील, लोकमान्य टिळक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जंयतीचा संयुक्तिक कार्यक्रम संपन्न झाला.
लोकनेते राजारामबापू पाटील,लोकमान्य टिळक ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक आप्पाराया पाटील,जत कृषी उत्पन्न बाजार उत्पन्न बाजार समितीचे सभापती दयगोंडा बिराजदार यांनी केले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील अध्यक्षस्थानी होते.
पाटील बोलताना म्हणाले की,लोकनेते राजारामबापू पाटील यांनी जत तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी खुजगाव धरण अस्तित्व आणले होते पण, राजकीय हेतुने ते सत्यात उतरले नाही, खुजगाव धरण असता ते जत तालुक्यातील दुष्काळी भागाला सायफन पद्धतीने पाणी मिळाले असते.दुष्काळी जतेत सिंचन योजना राबवून त्यांना हरितक्रांती आणायची होती.त्यासाठी त्यांनी शेवटपर्यत प्रयत्न केले.सामान्य जतनेला स्वातंत्र व हक्क मिळाला पाहिजे,याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. राजारामबापू पाटील यांचा जनसंवादावर गाढा विश्वास होता. त्यांच्याइतक्या पदयात्रा महाराष्ट्रातील कोणीही नेत्यांनी केलेल्या नाहीत. त्यांनी 1975 मध्ये वीस कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वाळवा तालुक्यात 650 किलोमीटरची पदयात्रा केली. सांगली ते उमदी 250 किलोमीटरची शेतकरी दिंडीसह पदयात्रा काढली. ते एक लोकनेते होतेच, पण पदयात्रीही होते.
त्यांचीच प्रेरणा घेऊन त्यांचे कनिष्ठ चिरंजीव जयंत पाटील यांनी राजकारणात प्रवेश करताच राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 6 जानेवारी 1986 रोजी वाळवा तालुक्यात पदयात्रा काढून आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली.

संस्थेचे व्हा.चेअरमन सुभाष पाटील,संचालक मल्लिकार्जुन फुटाणे,अप्पाराया पाटील,भिमराव नलवडे,आण्णाराया पाटील,सिध्दलिंगय्या जंगम,मल्लिकार्जुन सायगांव,तुकाराम जालगेरी,श्रीशैल कलादगी,बसय्या मठपती,शिवय्या जंगम,संस्थेचे सर्व संचालक,संस्था अंतर्गत सर्व शाखेचे मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.आभार राजू जमखंडीकर यांनी मानले,प्रास्तविक ए.सी.मेत्री यांनी केले.
संख ता.जत येथे लोकनेते राजारामबापू पाटील,लोकमान्य टिळक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
Attachments area