जत तालुक्यात बुधवारी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह | जत 3, बाज 1,समनडीतील एकाचा समावेश
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात बुधवारी पांच जणाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.
यात शहरातील तिघांचा समावेश आहे.
शहरातील कोरोना बाधित सचिवाच्या संपर्कातील दोघेे नातेवाईक,शहरातील एका टान्सपोर्ट कंपनीच्या मालकांला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.या टान्सपोर्ट मालकाला कोठून लागन झाली व त्यांच्या कितीजण संपर्कात आले यांची माहिती आरोग्य विभागाकडून गोळा करण्यात येत आहे.
बाजमधील कोरोना बाधित बोगस डॉक्टराच्या संपर्कातील एक व सनमडी येथील एका बाधिताचा समावेश आहे.

शहरासह तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहेत.शहरातील एका सोसायटीच्या सचिवाच्या संपर्कातील दोघांना कोरोनाची लागन झाली आहे.
त्याचबरोबर बाज येथील बोगस डॉक्टरांच्या संपर्कातील एका 70 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे.त्यामुळे बाजमधील बाधित संख्या दोन झाली आहे. सनमडी येथे मुंबई हून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना संस्था क्वांरटाईन करण्यात आले आहे. दरम्यान अन्य बाधिताच्या संपर्कातील लोंकाचा शोध सुरू आहे.दरम्यान जाड्डरबोबलाद येथील एका डांळिब व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या व्यापाऱ्याला त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जाड्डरबोबलादमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.