4 एकर जमीनीसाठी सख्या भावाने केला खून | संखमधील खूनाचा छडा : अडीच लाखाची सुपारी देऊन केला गेम

0

संख,वार्ताहर : संख ता.जत येथील रेवनसिध्द महादेव उगार खून प्रकरणाचा उमदी पोलीसांनी तीन दिवसात छडा लावला असून जमीनीच्या वादातून सख्या भावानेच सुपारी देऊन खून करून अपघाताचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.संशयित भाऊ गणेश महादेव उगार यांच्यासह अन्य दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक माहिती अशी,मुळ कर्नाटकातील सध्या संख येथे राहत असलेल्या रेवनसिध्द उगार यांचा काही दिवसापुर्वी घराशेजारी मयत स्थितीतील मृत्तदेह आढळून आला होता.त्यावेळी दारूच्या नशेत किंवा अपघातात मुत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात होती.दरम्यान मयत रेवनसिध्दचे शवविच्छेदन करण्यात आले होते.

Rate Card

त्याचा अहवाल सोमवारी उमदी पोलीसांना मिळाला होता.त्यात गळा आवळून व डोक्यात गंभीर दुखापत करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते.त्या अनुषंगाने विभागीय पोलीस अधिकारी संदिपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी तपासाची चक्रे फिरवली असता,या खून प्रकरणात मयत रेवणसिध्दचा सखा भाऊच असल्याचे समोर आले,त्याला ताब्यात घेत खाक्या दाखवताच त्यांने संख येथील 4 एकर जमीन हडप करण्यासाठी अडीच लाखाची सुपारी देऊन सख्या भावाचा खून केल्याची कबूली त्यांने पोलीसांना दिली आहे.सुपारी दिलेले अन्य दोघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून तपास सुरू असल्याचे कोळेकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.