संखमधील त्या तरूणांचा खून | पोस्टमार्टम अहवालात गळा आवळून व डोक्यात गंभीर मारहाण झाल्याचे स्पष्ट

0

जत,प्रतिनिधी : संख ता.जत येथील रेवनसिध्द महादेव उगार वय – 22 यांचा अखेर खून झाल्याचे शवविच्छेदन अवहालानंतर स्पष्ट झाले आहे.तसा उमदी पोलीसात सुधारित अज्ञाताविरोधात गुन्हा दाखला झाला आहे.



पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,संखपासून तीन किलोमीटरवरील अंकलगी रोडला रेवनसिध्द उगार यांची शेती आहे.ते मुळचे कर्नाटकातील आहेत.संख येथे त्यांनी जमीन घेतल्याने ते सध्या संख येथेच राहत होते.शनिवारी सायकांळी तो मृत्त स्थितीत आढळूला होता.त्यावेळी दारूच्या नशेत त्यांचा अपघात होऊन मयत झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.


Rate Card



सोमवारी त्या तरूणांच्या शविच्छेदनाचा गळा आवळून व डोक्यात मारहाण करून खून झाल्याचा अहवाल उमदी पोलीसांना प्राप्त झाला त्यानुसार सुधारित खून करणाऱ्या अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या तरूणांचा कोणत्या कारणाने व कोणी खून केला यांचा तपास उमदी पोलीसाकडुन केला जात आहे. लवकरच आरोपीला पकडू असे सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी सांगितले.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.