जत शहरातील आणखीन एक वयोवृद्ध कोरोना पॉझिटिव्ह
जत,प्रतिनिधी : जत शहरातील आणखीन एका 55 वर्षीय वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील हा सातवा रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण उमराणी रोडवर राहत होता.
या रुग्णाला त्रास होऊ लागल्याने भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.तेथे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.त्यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे.तालुक्यातील हा 116 वा रुग्ण असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी सांगितले.
