बोगस बियाणाप्रकरणी कृषी मंञ्यांना निवेदन सादर
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात बोगस बियाणाची विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करावी,अशा मागणीचे निवेदन कामगार सेनेच्या वतीने कृषी मंञ्याना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या खरीप हंगामात काही प्रमाणात पाऊस झाल्याने प्रत्येक शेतकर्यांनी बाजरी, मुग, उडीद, सोयाबीन,भुईमूग यासारख्या पिकांची पेरणी केली आहे.
परंतु यातील काही बियाणे म्हणजे बाजरी व भुईमूग उगवले तर काही ठिकाणी बियाणे उगवले नाही,असा प्रकार अनेक ठिकाणी घडला आहे.अशा प्रकारच्या तक्रारी कृषी सेवा केंद्र यांच्याकडे आल्या आहेत.या सर्व गोष्टींला शेतकरी कृषी सेवा केंद्राला जबाबदार धरतो.कारण तो शेतकरी तेथूनच खरेदी करतात.कृषी सेवा केंद्र वाल्याच म्हणत आहेत,शेतकर्यांनी कंपनीवर गुन्हे दाखल करावेत.बियाणेची तपासणी इथेच केली जाते,परंतु शेतकरी गाईगडबडीत खरेदी करतो व नंतर तक्रार करतो.पण याच तक्रारीच्या बद्दल कृषी सेवा केंद्राने संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवस दुकाने बंद ठेवली होता.

महाराष्ट्र कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांच्याकडे तक्रारी आल्या आहेत.
ते म्हणाले की,या बियाणाची तपासणी ही सेवा केंद्रा वरती न करता राजस्तरीय गुण नियंत्रण विभागाने करावी.तेथूनच तो माल डिस्ट्रिब्युटर कडे सोपवला जातो. तेथून तो शेतकर्यांना द्यावा,म्हणजे त्याची उगवण क्षमता किती आहे,हे समजते. शेतकर्यांची फसवणूक होणार नाही.त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार नाही.यांची पूर्ण परिपूर्ण माहीती घेऊन शासनाने विचार करावा असे दिनकर पतंगे यांनी सांगितले.