अंकलेमुळे डफळापूर सलाईनवर | बाधित रुग्णावर उपचार केलेला डफळापूरचा दवाखाना सील : डॉक्टरासह 10 जण क्वोरोंटाईन
डफळापूर, वार्ताहर :अंकले ता.जत येथील कोरोना बाधित 40 वर्षीय व्यक्तीवर उपचार केलेल्या डफळापूरातील खाजगी दवाखाना सील करण्यात आला आहे. त्या डॉक्टरासह संपर्कातील 10 जणांना संस्था क्वोरोंटाईन करण्यात आल्याची माहिती,वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित चौथे यांनी दिली.
अंकले येथील 40 वर्षीय कोरोना बाधित व्यक्ती मुंबई येथून 10 मार्चला अंकले येथे आला आहे.पाच महिन्यानंतर त्याला त्रास होऊ लागला.घरच्यांनी त्याला बाजमधील एका बोगस डॉक्टरांकडे दाखविले,तेथेही त्यांची प्रकृत्ती न सुधारल्याने डफळापूर येथील बुवानंद मंदिराजवळील एका खाजगी दवाखान्यात दाखविण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी सलग तीन दिवस सलाईन लावत औषधो उपचार केले.तरीही या रुग्णाच्या प्रकृत्तीत सुधारणा झाली नाही.त्यामुळे त्याला जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखविण्यात आले.तेथे त्याची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. बाजमधील बोगस डॉक्टर,डफळापूरचा खाजगी डॉक्टर,त्यांचा कर्मचारी,बाधिताच्या संपर्कातील 8 असे दहाजण संस्था क्वोरोंटाईन करण्यात आले आहेत.तर लांबच्या संपर्कातील जवळपास 40 जणांना होम क्वोरोंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान बाधित तरूणांला कोरोनाची लागण कोठून झाली यांचा शोध आरोग्य विभाग घेत आहे.उपचार घेतलेल्या डफळापूरच्या खाजगी दवाखान्यात रुग्ण तपासणीची कोणत्याही नोंदी नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांचा बेफिकीर पणा स्पष्ट झाला असून तपासणीसाठी आलेल्या रुग्णाच्या नोंदी ठेवण्याच्या खाजगी दवाखान्यांना सक्त सुचना असतानाही डफळापूरातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा डफळापूर करांवर संकट आणणारा आहे.

खाजगी दवाखान्यावर कारवाईचा अहवाल पाठविणार
डफळापूर केंद्रातील नोंदणीकृत्त खाजगी दवाखान्यात रुग्ण तपासणीच्या नोंदी ठेवणे,ताप,थंड,कोरडा खोकला अनेकवेळा उपचार करूनही रुग्ण बरा होत नसल्यास तात्काळ सरकारी यंत्रणेला कळविण्याच्या सुचना दिल्या आहेत.तरीही डफळापूरच्या खाजगी डॉक्टरांने निष्काळजी पणा केला आहे. त्यामुळे डफळापूर परिसरात धोका निर्माण झाला आहे.
दवाखान्यात तपासण्यात आलेल्या रुग्णांच्या नोंदी व्यवस्थित नसल्याने कोरोना बाधित रुग्णाचा कोठून संपर्क आला हे शोधण्यात अडचणी येत आहेत.त्याशिवाय या रुग्णामुळे पुढे कुणाला संपर्क झाला आहे का हेही तपासण्यात अडचणीचे ठरत आहे.दरम्यान निष्काळजी पणा केलेल्या खाजगी दवाखान्यावर कारवाईचा अहवाल पाठविणार असल्याचे डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चौथे यांनी सांगितले.