चंद्रशेखर गोब्बी हाय.,ज्युनियर कॉलेजची उज्वल यशाची परंपरा कायम

0

Rate Card

संख,वार्ताहर : चंद्रशेखर गोब्बी हायस्कूल व ज्युनियर काँलेज तिकोंडी येथील इ.12 वी चा निकाल शंभर टक्के लागला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे अर्थात एचएससी बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या 12 वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.असून यात जत तालुक्यातील तिकोंडी येथील चंद्रशेखर गोब्बी हायस्कूल व ज्युनियर काँलेज तिकोंडी विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्याची माहिती, प्राचार्य सदाशिव माळी व उपप्राचार्य संतोष गोब्बी यांनी दिली.

पहिले तीन विद्यार्थी असे, प्रथम क्रमांक कु.सौंदर्या रमेश पाटील (74.92 टक्के),द्वितीय क्रमांक कु.आकाशी अमसिद्धा सुसलाद (74.46 टक्के),तृत्तीय कु.राजश्री अर्जुन शिळीन (73.23 टक्के) गुण मिळवत यश संपादन केले.संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी,खजिनदार सुभाष गोब्बी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी,प्राध्यापक,उपप्राचार्य व  प्राचार्य यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.