माडग्याळ | तम्मणगौंडा रवीपाटील यांच्याकडून 7 हजार मास्कचे वाटप

0

माडग्याळ,वार्ताहर : सांगली जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौंडा ईश्वरप्पा रविपाटील यांच्याकडून जाडरबोबलाद जि.प.गटात आपल्या स्वीय निधीतून 7 हजार मास्कचे वाटप करण्यात आले.कोरोना पासून बचाव व्हावा यासाठी त्यांच्याकडून एन 95 मास्क नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले. 
आज अखेर लांब असलेला कोरोनाचा ग्रामीण भागातील शिरकाव पाहून समाजातील सर्वसामान्य घटकांचा कोरोना पासून संरक्षण व्हावे म्हणून जि. प.गटात चांगल्या प्रतीचे मास्कचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याचे तम्मनगौडा रविपाटील यांनी सांगितले. गटामध्ये एकूण सात हजार मास्कचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.जाडरबोबलाद, माडग्याळ, उटगी,अंकलगी,व्हसपेठ, गुड्डापूर याठिकाणी मास्कचे वाटप करण्यात आले आहे.त्यांचबरोबर उमदी त्यांच्या गटात नसतानाही त्या ठिकाणी पाच हजार मास्क वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी सर्वांनी मास्कचे वापर करावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. आवश्यकता नसताना घराबाहेर पडण्याचे टाळावे असे सांगितले. 
Rate Card

यावेळी त्यांनी माडग्याळ मधील व्यापारी बंधूना स्वतः जाऊन मास्कचे वाटप केले. याआधीही यांच्याकडून सेनेटायझरचे वाटप करण्यात आले होते.त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात गरीब जनतेची उपासमार होऊ नये म्हणून जि.प. गटात दहा टन अन्न धान्याचे वाटप तम्मनगौडा रवीपाटील यांच्याकडून करण्यात आले होते.कोरोनाच्या संकट काळात सगळेच नेते आपापल्या जिवाच्या काळजीने गायब असताना जनमानसात जाऊन सर्वसामान्य नागरिकांची काळजी करत असणाऱ्या तम्मनगौडा रविपाटील यांची नागरिकांकडून आभार मानले जात आहे. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकट  काळात विशेषतः रात्रंदिवस काम करणाऱ्या डॉक्टर,आशा वर्कर,आणि पोलीस खात्याचे कौतुक केले.कोरोनाच्या संकट काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावण्याऱ्या या कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आणि नागरिकांनी प्रशासनाला या लढाईत सहकार्य करण्याची विनंती केली.  

यावेळी प.स.उपसभापती विष्णू चव्हाण, मार्केट कमिटी संचालक विठ्ठल निकम, लिंबाजी माळी, महादेव माळी, जाडरबोबलाद उपसरपंच प्रकाश काटे, माजी उपसरपंच लक्ष्मण कोरे, जेटलीन कोरे, कामण्णा बंडगर, राजू कांबळे, बाबासाहेब कांबळे, विकी वाघमारे, बजरंग व्हंकळे, विठ्ठल पुजारी, नंदयाप्पा बाबा माळी, लक्ष्मण कांबळे,कामू कोळेकर, अवि लाड, बिराप्पा चोगुले, सिद्धू धुमाळे, शमन  मुल्ला, रशीद मुल्ला, सचिन वाघमारे,आदी मान्यवर उपस्थित होते. माडग्याळ ता.जत येथे मास्कचे वाटप करताना माजी सभापती तम्मणगौंडा रवीपाटील व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.