अखेर दुय्यम निबंधक कार्यालय 14 दिवस बंद | संकेत टाइम्सचे वृत्त खरे ठरले : बाधित रुग्ण सापडल्याने दक्षता

0

जत,प्रतिनिधी : जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालय होणार कोरोनाचे प्रसार केंद्र बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत दैनिक संकेत टाइम्सने दिलेले वृत्त खरे ठरले आहे. दैनिक संकेत टाइम्सने यापूर्वीच जत येथिल मोरे काॅलनी संभाजी नगर जत येथिल कोडग काॅम्प्लेक्स या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेले दुय्यम निबंधक श्रेणी-1 जत हे कार्यालय कोरोनाचे प्रसार केंद्र होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. 

जत येथिल स्थलांतरीत दुय्यम निबंधक कार्यालय हे मोरे काॅलनी संभाजी नगर या रहिवासी भागात आहे. 




या कार्यालयात पहिल्या मजल्यावर दुय्यम निबंधक श्रेणी-1 जत हे कार्यालय असून कार्यालयाच्या खालील बाजूस मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांच्यासाठी जागा दिल्याने व या जागेतच दोन झेराॅक्स दुकानदार तसेच कोल्ड्रींक दुकान असल्याने या ठिकाणी मुद्रांक खरेदी करण्यासाठी तसेच दस्त तयार करण्याचे काम करणारे मुद्रांक विक्रेते यांच्यासमोर पक्षकारांची मोठी गर्दी होत असते.तसेच कोरोनाचे पार्श्वभूमीवर पक्षकार हे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करित नसल्याने जत दुय्यम निबंधक कार्यालयात जत तालुक्यातील पक्षकारां बरोबरच तालुक्याच्या सिमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील बेंळगाव व विजयपूर या जिल्ह्यातूनही पक्षकार कारखाना करारासाठी मुद्रांक खरेदी करण्यासाठी येत असतात.



Rate Card


तसेच हे लोक कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करित नसल्याने या लोकांपासून जत दुय्यम निबंधक कार्यालय हे कोरोनाचे प्रसार केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही,असे वृत्त संकेत टाइम्सने प्रसिद्ध केले होते.नुकतेच जत दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ असलेल्या एका किराणा व स्टेशनरी दुकानदाराच्या वयोवृद्ध आईला कोरोना झाल्याने व  वयोवृद्ध महिलेचे कोरोना कनेक्शन हे कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील असल्याने या कोरोना पाॅझीटीव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील चार व्यक्तींना, या महिलेच्या घरी भाड्याने राहाणारे तीन व्यक्तींना व या महिलेवर उपचार करणारे जत येथील एक खासगी डाॅक्टर अशा आठ व्यक्तींना जत येथिल कोविड सेंटर मध्ये संस्थात्मक काॅरंटाईन केले आहे. 




प्रशासनाने खबरदारी म्हणून येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे चौदा दिवसासाठी सिल केले असून. हा संपूर्ण परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. तसेच या परिसरात जत नगरपरिषदेचे या प्रभागाचे नगरसेवक स्वप्निल शिंदे लक्ष्मण उर्फ टिमू एडके यानी जत नगरपरिषदेकडून अग्नीशामक यंत्रणेमार्फत औषध फवारणी करून हा परिसर निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. आज शनिवारी जतचे उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत आवटे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डाॅ. निलेश पालवे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.मनोज देसाई, तालुका आरोग्य अधिकारी श्री. संजय बंडगर, तहसिलदार सचिन पाटील आदीनी या परिसराला भेट देऊन परिस्थिती ची पहाणी केली.कोरोनाचे प्रसारासंदर्भात वस्तूनिष्ठ वृत्त दिल्याबद्दल दैनिक संकेत टाइम्स चे सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.