जतेत कर्नाटकातील हमालाचा मुत्यू
जत,प्रतिनिधी : जत येथील राजे विजयसिंह दुय्यम बाजार आवार जत येथे काम करणाऱ्या हमालाचा मृतदेह आढळून आला.कर्नाटकातील कोटनट्टी येथील हा हमाल आहे.जबरदस्त भोसले (वय 38) असे त्यांचे नाव आहे.
शहरातील मार्केट यार्ड व बाजार पेठेत जबरदस्त भोसले हमालीचे काम करत होता.मार्केट यार्डतील गाळ्यासमोर रात्री तो मुक्काम करत होता.त्याला दारूचे व्यसन होते.शुक्रवारी रात्री त्यांचा मृतदेह आढळून आला.जत पोलीसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा करून मृत्तदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.दारूच्या नशेत,अन्नपाण्या विना जबरदस्तचा मृत्यु झाला असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.