आशाच्या आंदोलनाला यश | मानधन वाढीचा आदेश निघाला : आता लढा शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी ; कॉ.कोळी

0

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र आशा,गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू)च्या आंदोलनाच्या पहिल्या टप्याला यश मिळाले असून कोरोना काळात प्रभावीपणे काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकाच्या मानधनात वाढ केलेचा आदेश शासनाने 1 जूलैला काढला आहे.


या जत तालुक्यात पुन्हा 8 जण कोरोना बाधित,जतची संख्या 105 | गुलगुंजनाळ,निगडी खुर्द,धावडवाडी,उमदीतील प्रत्येकी दोघाचा समावेश | मानधन वाढीमुळे आशा,गटप्रवर्तकांना बळ मिळणार आहे.मात्र आशा व गटप्रवर्तकांना आरोग्य कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत घेत नाही,तोपर्यत हा लढा चालूच राहिल,अशी माहिती, फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा कॉ.मिना कोळी,संघटक कॉ.हणमंत कोळी यांनी दिली.

Rate Card

आशाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या फेडरेशनचा राज्यभर विस्तार वाढविण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात संघटना बळकट करण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील सुमारे 90 टक्के आशा व गटप्रवर्तकांना फेडरेशनमध्ये सामावून घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यासह ‘लॉकडाऊनपेक्षा शिस्त पाळण्याची गरज’ |राज्यातील आशा व गटप्रवर्तकांचा तीव्र लढ्याने शासनाला जाग आणण्याचे काम केले आहे. या पध्दतीने आपल्या पुढील मागणीसाठी संघटित लढा उभारायचा आहे.त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त आशा व गटप्रवर्तकांनी सीटूचे सभासद व्हावे,असे आवाहन कॉ.मीना कोळी यांनी केले.कॉ.उमेश देशमुख, सुरेखा जाधव, अंजु नदाफ,शबाना आगा सुवर्णा सणगर,मयुरा पारथनळी,मंजुषा साळुंखे दिपाली होरे,ऋतुजा पाटील,वर्षा ढोबळे,सुषमा आमराल यांनी राज्यभर आंदोलनाची धग सरकारला मानधन वाढविण्यास भाग पाडली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.