कोरोनाची साखळी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका : संजय कांबळे
जत,प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णाची वाटचाल ही एक हजारच्या उंबरठ्यावर येऊन पोहचत असून कोरोनाने जिल्ह्यात आजपर्यंत पंचवीस लोकांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील लोकांना कोरोना या महामारीचे गांभीर्य वाटत नसल्याने कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी,असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी केले आहे
सांगली जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर व बेळगाव तसेच जिल्ह्याच्या शेजारील सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे पाॅझीटीव्ह रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे पार्श्वभूमीवर बाहेरून सांगली जिल्ह्यात येणारे व सांगली जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाणारे लोकांवर जिल्हाबंदी केली असतानाही मोठ्या प्रमाणात बाहेरील लोक हे कोणत्याना कोणत्या कारणाने जिल्ह्यात प्रवेश करित आहेत.
