कर्तृत्ववान सामन्यातील असामान्य नेतृत्व ; राहुल काळे

0

मैत्रीच्या दुनियेतील राजामाणुस ज्याला सर्वसामान्य ताळगळतील लोकांची जाण असणारे कृत्ववान युवा नेते राहूल काळे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा..

दुर्लक्षित आदिवासी पारधी समाजात जन्मलेला एक हिरा परिवर्तनाची साद घालत आहे.

जत शहरातील पारधी समाजात राहुल काळे यांचा जन्म झाला.मुळात दुर्लक्षित असलेल्या या समाजात राहुल काळे यांची जडणघडण झाली.या जडणघडणीत समाजातील रुढी परंपरा,सामाजिक दुर्लक्षिता यात परिवर्तन आणायचे म्हणून राहुल काळे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.आमदार विक्रमसिंह सांवत यांचे कट्टर समर्थक असलेले राहुल काळे यांनी दादाच्या विधानसभा निवडणूकीत प्रभावीपणे काम केले आहे.
Rate Card

रस्त्याच्या साईटपट्ट्या बनल्या नाले | तालुक्यातील रस्ते कामात मोठे गफले : गटारी गायब |

त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शहरासह तालुक्यातील पारधी समाजात परिवर्तनाची साद घातली आहे.सामाजिक द्रुवीकरण बदलण्यासाठी त्यांनी समाजातील युवकांना बरोबर घेत त्यांच्यात नव्या बदलाची सुरूवात केली आहे.कोरोना महामारीत त्यांनी सामाजातील नागरिकांना मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

समाजातील युवकांना रोजगार,आर्थिक हातभार लागावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत.समाजातील तळागाळातील नागरिकांत बदल घडविण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आहे.ते आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या माध्यमातून पुर्ण करून दुर्लक्षित पारंधी समाजातील सामाजिक स्तर उंचवतील एवढे निश्चित.

अशा युवा नेत्यांला आजच्या वाढदिनी आभाळभर शुभेच्छा..शंब्दाकन : मिथून माने,जत
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.