कोंतेबोबलादमध्ये पाच दिवस कडकडीत बंद
कोतेंबोबलाद,वार्ताहर : कोंतेबोबलाद लगतच्या गुलगुंजनाळ मध्ये कोरोना बाधित चार रुग्ण सापडल्याने कोंतेबोबलादमध्ये पाच दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला.
गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.गुलगुंजनाळ मध्ये कोरोनाचा प्रभाव वाढल्याने लगतच्या गावांतही संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला होता.त्या पार्श्वभूमीवर संरपच पुंडलिक कांबळे,पोलीस पाटील श्रीहरी पाटील व पदाधिकाऱ्यांनी पाच दिवस कोतेंबोबलाद लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार पाच दिवसानंतर दुकाने उघडण्यात आली आहेत.आताही दुकानदारासह नागरिकांनी सोशल डिस्टसिंग,मास्क,सँनिटाझरचा वापर करण्याचे आवाहन संरपच कांबळे यांनी केले आहे.

कोतेंबोबलादमध्ये बंदमुळे रस्ते सुनसान झाले होते.