बाजरी बियाणे न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट | शेतकऱ्यांसमोर नवे संकट ; चांगले बियाणे देण्याची जबाबदारी कुणाचे

0सोन्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील महत्वाचे असलेल्या बाजरीचे बियाणे न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.मृग नक्षत्रात तालुक्‍यामध्ये यंदा दमदार पावसाने हजेरी जरी लावला नसला तरी पेरणी योग्य हलक्या स्वरूपाच्या पावसावर  शेतकऱ्यांनी खरीप पेरणीस सुरुवात केली.त्यामध्ये बाजरी, तूर, सूर्यफूल, मका, मुग आदी पिकांची पेरणी केली. त्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या दराचे बियाणाची खरेदी केली.पेरणीसाठी बैल उपलब्ध न झाल्यामुळे ट्रॅक्‍टरच्या साह्याने पेरणी केली. डिझेलच्या दरवाढीमुळे पेरणीसाठी मागेल तो दर देऊन पेरणी केली.बाजरी क्षेत्रात वाढ झाली असताना त्यांनी पेरणी केलेल्या शेतकऱ्याचे बियाणे उगवलेच नसल्याचे प्रकार उघडकीस येत आहे.हा प्रकार होत असताना यावर नियंत्रण ठेवणारा कृषी विभाग काय करतोय असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.भूमिपुत्र म्हणून तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

जत तालुक्यासह पूर्वभागातील  जवळपास असंख्य शेतकऱ्यांनी बाजरी बियाणे उगवले नसल्याच्या तोंडी तक्रारी करत आहेत.नव्याने पेरणी करायचे झाल्यास बियाणांचा खर्च,पेरणीचा खर्च, आवश्यक खतांचा खर्च यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांत कमालीचा असंतोष दिसून येत आहे. त्याच बरोबर बियाणे पुरवणाऱ्या कंपन्या विरोध कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहे.एकाच गावातील शेतकऱ्यांच्या एकाच वेळी झालेल्या पेरण्या असूनही काही शेतकऱ्यांचे बियाणे उगवतच नाही. तुरळक कुठे- कुठे बियाणे उगवते. त्यानंतर शेतकऱ्यांचे डोळे उघडतात. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहते. अगोदरच पैशांची अडचण असताना मोठ्या कष्टाने पैशांची जुळणी करून पेरणी केलेली असते. त्या दुबार पेरणीची संकट असल्याने शेतकरी पूर्णपणे रडकुंडीला आला आहे. त्यातच कोरोना व्हायरसाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा खूप मोठा फटाका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात हे नव्याने मानवनिर्मित संकट उभे राहिल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.


 
Rate Card

आधी दोन महागड्या बियाण्याच्या पिसाव्या आणून पेरणी केली,मात्र म्हणावे तशी उगवण झाली नाही.परत आणून पेरणी केली आहे.डबल पेरणीचा व बियाणांचा आर्थिक खर्च सोसावा लागला आहे.कोरोनाचा फटक्यात अगोदर आम्ही अडचणीत आहोत.पुन्हा दुबार पेरणीचे संकट,पुढे पिके कशी येणार असा हा प्रश्न उभा आहे.कृषी विभागाचे अधिकारी तक्रार करा म्हणतात.तक्रारीनंतर पुढे काय होतयं माहिती नाही.आम्ही मात्र संकटात कायम आहोत.


 – गजानन दादू कटरे

लकडेवाडी ता जतLeave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.