विट्यात मोटारी,एच.टी.पी.चोरटे ताब्यात

0

विटा : गांधीनगर (विटा) येथे संशयास्पद फिरत असलेल्या मोटारी,इंजिन चोरट्यांना पकडत लाखोचा मुद्देमाल जप्त केला.विशाल ऊर्फ विकास रामचंद्र महिंद (रा.कडेपुर, ता. कडेगाव),सागर ऊर्फ प्रणय मानसिंग जाधव रा. गांधीनगर,विटा, तात्यासो सुभाष जाधव,विकास सुदाम पवार,रुचिक आनंद साळुखे (सर्व रा. गांधीनगर,

विटा, ता. खानापूर) या संशयितांना विटा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी,संशयित चोरटे विट्यात फिरत असताना पोलीसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता ते गांधीनगर, विटा, वडीये रायबाग, खेराडे वांगी, आंबेगाव या परीसरामधील मोटर व एच.टी.पी. चोरी करुन त्याची विक्री करीत असल्याचे समोर आले.

Rate Card


परीसरामधील चोरी केलेल्या 6 मोटरी अंदाजे 63,500 रुपये किंमतीच्या व 5:एच.टी.पी.अंदाजे 75 हजार किंमतीचे असे एकुण 1,28,500 रुपये किमतीच्या मोटर व एच.टी.पी.जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्यांचेकडुन गुन्हा करतेवेळी वापरलेली 2 पल्सर,1 स्प्लेंडर अशी 3 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.जप्त करण्यात आलेल्या मोटर व एच.टी.पी. पैकी विटा पोलीस ठाणे हददीमधील २ मोटर,2 एच.टी.पी.,कडेगाव पोलीस ठाणे हददीमधील 2 एच.टी.पी.,चिंचणी वांगी पोलीस ठाणे हददीमधील 1 मोटर असे असुन उर्वरित 3 मोटर,1 एच.टी.पी. मालकांचा शोध विटा पोलीस घेत आहेत.
विट्यात मोटारी,एच.टी.पी.चोरट्यासह पोलीस पथक

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.