जत,प्रतिनिधी : बियाणे पेरलेले बियाणे उगवले नसल्याचा प्रकार जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. त्यामुळे तक्रारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध कंपनीच्या बियाण्याची चौकशी करण्यात येऊन फसवणुक केल्याबद्दल कारवाई करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
जत तालुक्याल सन 2020-21 या खरीप हंगामासाठी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली, पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बाजार पेठेत कृषी सेवा केंद्रातून विविध कंपनीच्या बियाण्याची खरेदी केली खरेदी करून बियाण्याची पेरणी केली असता अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहे. तर काहीनी तक्रारी न करता दुबार पेरणी केली आहे. बियाण्याची उगवन न झाल्याने शेतक-र्यांना आर्थिक नुकसानी बरोबरच मानसिक त्रास ही सहन करावा लागला आहे. तर बियाणे उगवले नसल्याने कंपनीतर्फे शेतक-यांची फसवणूक झाली.
असून, हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे पेरलेले बियाणे उगवले नाही अशा शेतकरयांनी फसवणूक झाल्या प्रकरणी कंपनी विरुध्द कारवाई करावी व तक्रार करणाऱ्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ही केली आहे.जत तालुक्यातील रावळगुंडवाडी, मेंढीगिरी, खोजानवाडी व तालुक्याच्या पूर्व भागातून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत.जत तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शेतक-यांनी पेरलेले बियाणे उगवलेला नाही. त्यात अनेक शेतक-यांनी वेगवेगळया कंपनीच्या बियाण्यांची लागवड केली होती. तर नामवंत कंपनीचे बियाणे जास्त भावात घेऊन पेरले होते. परंतु महाग बियाणे ही उगवले नाही, तर बियाणे न उगवण्याचे प्रकार तालुक्यात मोठ्या संख्येने आहे. त्पामुळे या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली जात आहे.