निगडी खुर्द हैंद्राबादहून आलेल्या तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह
जत,प्रतिनिधी : निगडी खुर्द ता.जत येथील एका बाधिताच्या संपर्कातील आणखीन तिघेजण कोरोना बाधित आढळून आले आहेत.मुळ निगडी खुर्दचे मात्र हैंद्राबाद येथे गलाई व्यवसायिक असलेले सहा जण 7 जुलैरोजी हैंद्राबादहून वाहनाने निगडीत आले होते.त्यातील एकाचा दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यांच्या संपर्कातील हैंद्राबादहून आलेले पाच न निगडी येथे संपर्कात आलेले सहा अशा बारा जणाचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.त्यापैंकी बाधित रुग्णांच्या बरोबर हैंद्राबादहून आलेले तिघाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य कुंटुबियाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.बाधित रुग्ण व संपर्कातील नातेवाईक निगडी खुर्द गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर राहत होते.एका बाधिताचा रिपोर्ट येताच बाकींच्याना होम क्वोरोंटाईन करण्यात आले होते.त्यामुळे बाधित रुग्णाचा गावात संपर्क आला नसल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले.तरीही आम्ही खबरदारी घेत आहोत,असे तालुका वैद्यकीय डॉ.संजय बंडगर यांनी सांगितले.
