सोलापूरची जतलाही धास्ती | पुर्व भागात कोरोना प्रभाव वाढतोय

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्याच्या शेजारील सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून यामुळे  जत शहरातील नागरिकांसह जत तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाची मोठी धास्ती घेतली आहे.तालुक्याच्या शेजारी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सद्धस्थितीत कोरोनाचे 899 रुग्ण उपचार घेत असून येथील रूग्णामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जत शहरासह तालुक्यात धास्ती निर्माण झाली आहे.

जत तालुक्यातील बिळूर येथे कोरोनाचे एकोणसत्तर रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी एका रूग्णाचा मिरज येथिल एका मोठ्या खासगी हाॅस्पीटल मध्ये उपचारादरम्यान  कोरोनाने बळी गेला आहे.

जतमधील दडपलेल्या पाच मृत्यूप्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करा ; विक्रम ढोणे |

बिळूर हे गांव सांगली जिल्हयातील द्राक्षे उत्पादन करणारे मोठे गाव आहे. या गावातील द्राक्षबागायतदार व मजूर लोक द्राक्षे कटिंग करणे, डाळींबाची कलमे बांधणे यासाठी जत तालुक्याच्या शेजारी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात जा ये करित आहेत.बिळूर येथील द्राक्षे कटिंग करणे व डाळींबाची कलमे बांधणीकरणारे येथील व्यक्तीच्या संपर्कात कोणीतरी कोरोना पाॅझीटीव्ह व्यक्ती आल्यानेच बिळूर येथे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढल्याची शक्यता येथील रहिवासी व्यक्त करताना दिसत आहेत.

जतच्या रस्त्याला ठेकेदाराची किड | निकृष्ठ कामे करून कोट्यावधीचा निधीवर डल्ला : सर्व विभागात लुटारूच्या टोळ्या |

 

बिळूर येथील लोकांचा तसेच जत तालुक्यातील उत्तर बाजूस असलेल्या व पश्चिम बाजूस असलेल्या गावातील लोकांचा शेजारील सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संपर्क असल्याने व जत शहरातील अनेकांचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा,सांगोला ,पंढरपूर या तालुक्यातील लोकांशी रोटी बेटीचे सबंध असल्याने येथिल लोकांचे सोलापूर जिल्ह्यात जाणे येणे सुरूच आहे.राज्य सरकारने कोरोनाचे पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरील प्रवासाला बंदी आणली असताना ही जत तालुक्याच्या सिमेवरून पोलीस व प्रशासन यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिक  हे जत तालुक्यात येत जात आहेत. तर जत तालुक्यातील लोकही सोलापूर जिल्ह्यात जात येत आहेत.

जत तालुक्यात कोरोनाचे नवे चार रुग्ण,गुलगुंजनाळ 3, उमदीतील बालक बाधित |

Rate Card

कोरोनाचे पार्श्वभूमीवर प्रशासनाचेवतीने लागू केलेले आदेश व सुचना ह्या फक्त कागदापुरत्या मर्यादित असून प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन हे कोरोना बाबत गंभीर नसून जत तालुक्यात कोरोना पाॅझीटीव्ह शतकाकडे वाटचाल करीत असलातरी  प्रशासन व पोलीस प्रशासन जत शहरासह जत तालुक्यातील सोशल डिस्टन्सिंग चे उल्लंघन करणारे बाबत गंभीर नाही. जत शहरात तर प्रमुख बाजारपेठेत तसेच स्टेट बॅंक ऑफ इंडिया तसेच विविध सरकारी कार्यालये या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग चे उल्लंघन करण्यात येत आहे.

जतेत जुगार अड्ड्यावर छापा | 13 जूगाऱ्यावर कारवाई : 1640 रूपये जप्त |

जत शहरात तर पोलीस प्रशासनासमोरच दुचाकी व चारचाकी  वाहनधारक हे नियमांचे उल्लंघन करीत आहेत पण पोलीस त्यांच्यावर काहीच कारवाई करताना दिसत नाहीत.जिल्ह्यात कोरोना पाॅझीटीव्ह व्यक्तीची संख्या ही साडेचारशेच्या वर गेली आहे. तर एकविस व्यक्तीचा कोरोनाने बळी गेला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. जयंतरावजी पाटीलसाहेब यानी जिल्ह्यातील लोक हे  सोशल डिस्टन्सिंग चे पालन करित नाहीत त्यांची सोशल  डिस्टन्सिंग चे  बाबत अशीच भूमिका राहीली तर जिल्ह्यात लाॅकडाऊन करावे लागेल असा इशारा सांगली येथे  प्रशासनाचे बैठकित दिला आहे.

ठेकेदार मठ यांनी केलेली रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट | रिपाइचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली चौकशीची मागणी |

त्यामुळे बिळूर येथील कोरोना बाधित रूग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जत तालुक्याच्या शेजारी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातून जत तालुक्यात येणारे लोकांवर व जत तालुक्यातून शेजारील सोलापूर जिल्ह्यात जाणारे लोकांचेबाबतीत कठोर निर्णय घ्यावा तरच जत तालुक्यातील कोरोना आटोक्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.