जत कोविड सेंटरला 130 पीपीए किट, गॉगलची मदत

0

जत,प्रतिनिधी : जत कोविड सेंटरसाठी जत मध्ये डाळींब व्यापारी दस्तगिर नदाफ व युवक नेते सलीम नदाफ यांच्या वतीने पीपीए किट व गॉगल आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते तहसीलदार सचिन पाटील याच्याकडे सुपूर्द करण्यात आले.कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.त्याच्या स्वरक्षणाठी जतचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दस्तगिर नदाफ व सलीम नदाफ यांना पीपीए किट द्यावेत असे आव्हान केले होते.


Rate Card त्यांनी पीपीए किट व गॉगल उपलब्ध करत प्रशासनाकडे सुपूर्द केले.यावेळी प्रसिद्ध डाळींब व्यापारी दस्तगिर नदाफ,माजी नगरसेवक निलेश बामणे,जत शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे,उपाध्यक्ष सलीम नदाफ,इकबाल नदाफ सोहेल नदाफ दीपक कांबळे व  नदीम मुल्ला उपस्थित होते.आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की, प्रशासनाला हातभार म्हणून नदाफ कुटुंबियांकडून 130 पीपीए किट प्रशासनाकडे सुपूर्द केलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नदाफ कुटुंबियांकडून सीएम हेल्थकेअर फंडासाठी 50 हजार रूपयाची मदत नदाफ कुटुंबीयांनी केलेली आहे.त्याचे हे कार्य कौतुकास्पद आहे. 

तहसीलदार सचिन पाटील म्हणाले की, कोविडं सेंटर येथे सुरक्षा कर्मचारी यांना पुरेसे पीपीए किट उपलब्ध नसल्याने आम्ही आव्हान केले होते.नदाफ कुटुंबीयांकडून झालेली मदत कोरोना काळात महत्वाची ठरणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.