बीएसएनएलचा भोगळ कारभार | इंटरनेट बंदमुळे कामकाज रेंगाळले : विक्रम ढोणेच्या दणक्याने अधिकारी हलले

0

जत,प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यात बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. गेले दोन महिने सुरू असलेल्या अनागोंदी व सतत खंडित होणाऱ्या सेवा,अनेक समस्यामुळे बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराचा जतमधील नागरिकांना फटका सहन करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.गेल्या काही दिवसापासून बिएसएनएल कंपनीचे नेटवर्क बंद होते.यामुळे जत शहरातील राष्ट्रीयकृत बँका तसचे सर्व शासकीय कार्यलायातील कामकाज दोन दिवसापासून बंद आहे

Rate Card

या बंद नेटवर्कमुळे नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत होती.अनेकवेळा तक्रारी करूनही बीएसएनएलच्या जत कार्यालयाचा हा भोगळ कारभार सुधारला नव्हता.वैतागलेल्या काही ग्राहकांस युवक नेते विक्रम ढोणे यांनी बिएसएनलचे जत कार्यालय गाठले.बंद असलेल्या नेटवर्कबद्दल जाब विचारला.  डफळापूर येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने नेटवर्क मध्ये अडचणी येत आहेत,असे जुजबी उत्तर उपस्थित अधिकाऱ्यांनी ढोणे व ग्राहकांना दिले.संतप्त ग्राहक व ढोणे यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी करत यापुढे कारभार सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.