खड्डेच खड्डे चोहीकडे, डांबरी रस्ते गेले कुणीकडे… प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था : तातडीने लक्ष देण्याची व्यापाऱ्यांची मागणी
जत,प्रतिनिधी : जतचे नाक म्हणून समजली जाणाऱ्या जत शहरातील अपवाद वगळता सर्वच रस्ते अत्यंत निकृष्ट झाले आहेत़.सर्वत्र खड्डेच खड्डे दिसून येत आहेत़ एवढेच नव्हे तर वाढत्या वाहनांची गर्दी व पडलेल्या खड्ड्यांमुळे उन्हाळ्यात धुळीचे तर आता पावसाळ्यात राडेराडने लगच्या व्यापाऱ्यासह नागरिकाचे बेहाल सुरू आहे.निकृष्ट रस्ते, धूळ, ड्रेनेजच्या पाण्यामुळे सुटणारी दुर्गंधी आदी समस्यांनी नागरिक संतापले आहेत.
बाधकांम विभाग व पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी याकडे वेळीच लक्ष घालून रस्त्याची समस्या सोडवाव्यात अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यांची अवस्था भयानकच बनली आहे.

खड्ड़्यातून गाडी आदळली की खड्ड्यातील पाणी थेट दुकानात येते़ त्यामुळे व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ एवढेच नव्हे तर दुचाकी व चारचाकी जाताना त्या गाड्यांच्या चाकामुळे उडणारे बारीक खडेही थेट दुकानात येतात़ काही वेळा तर दुकानात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकासही ते दगड लागल्याच्या घटना घडल्या असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले़
जत शहरातील सांगोला -अथणी रस्त्यावर खड्डा दोन दिवसात डबका बनला आहे.