जतचा दुष्काळ ना.जयंत पाटीलच संपविणार ; उत्तम चव्हाण

0


जत,प्रतिनिधी : कायमस्वरूपी दुष्काळी जत तालुका सांगली जिल्ह्यातील नव्हेतर संपुर्ण महाराष्ट्रातील तालुक्यांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिप्पट विस्ताराने मोठा असलेला तालुका आहे. पण विकासाच्या दृष्टीने इतर तालुक्यांपेक्षा तीन तप मागे असलेला तालुका आहे. तरी पाण्याअभावी या तालुक्यातील कित्येक जमीन ही वर्षानुवर्षे पडीक व नापिक अवस्थेत आहे.ही नापिक शेतीतून कृषी क्रांती घडविण्यासाठी जिल्ह्याचे सुपुत्र तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कबर कसली असून ते जत तालुक्याचा लवकरचं दुष्काळ हटविणार हे निश्चित आहे,अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस जत युवक तालुका अध्यक्ष उत्तम चव्हाण यांनी दिली.

उत्तम चव्हाण म्हणाले, लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे जत तालुक्यावर नितांन्त प्रेम होते, त्यांनी कायमच जत तालुक्याच्या दुष्काळ हटविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

तत्कालीन सरकारमध्ये बापूंनी खुजगांव मार्गे जत व जत तालुक्याच्या पुर्व भागापर्यंत निव्वळ सायपन पध्दतीने पाणी नेण्याच्या योजने संबधीत मुद्दा मांडला होता.मात्र काही तांत्रिक प्रशासकीय अडचणीमुळे ती योजना पुर्णत्वास गेली नाही.परंतु बापू जत तालुक्याचा दुष्काळ संपवण्यासाठी कायम प्रयन्तशील होते.त्याच जत तालुक्यात पाणी खळखळविण्यासाठी त्याचे सुपुत्र ना.जयंत पाटील यांनी प्रयत्न चालविले आहेत. 

जत तालुक्यात प्रत्येक वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.सिंचन योजना सुरू होऊन शेतीसाठी पाणी मिळेल या आशेवर येथील जनता आहे.जत तालुक्यातील विकास कित्येक वर्षांपासून खुंटलेला आहे. येथील कित्येक विद्यार्थी उच्चशिक्षीत आहेत. नोकरी व उपजिवीकेसाठी त्यांना राज्यातील व परराज्यातील प्रगतशील शहरामध्ये स्थलांतरीत व्हावे लागत आहे. कित्येक जणांना उद्योग व्यवसाय शेती व इतर कामांची कमतरता असल्याने तालुक्यातुन बाहेरगांवी स्थलांतरीत व्हावे लागत आहे. कारण त्यांच्यासाठी लागणारी योग्य तो रोजगार येथे उपलब्ध नाही. यामुळे तालुक्याचा म्हणावा असा विकास झालेला नाही. या सर्व गोष्टींना कारणीभुत आहे. तो फक्त इथे असणारा दुष्काळ आणि हा दुष्काळ मिटवणे व तालुक्याचा चालु असणारा पाणी संघर्ष संपविणे हे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी ना.जयंत पाटील यांनी आहे. आणि इथे काहीही पेरले तरी ते उगवणार अशी परिस्थीती देखील आहे परंतु सध्याचा पाण्याचा अभाव असताना इथला शेतकरी बोअरवेल, साठवण तलाव, पाझर तलाव व पावसाच्या पाण्यावर साठवल्या जाणाऱ्या तुटपुंज्या पाणीसाठ्यावर द्राक्ष, डाळींब, ड्रॅगनफ्रुट, बोर, ॲपल बोर असे विविध फळ उत्पादन त्याच बरोबर सरासरी पर्ज्यन्याने अत्यंत कमी प्रमाणात पर्जन्यमान होऊन सुध्दा बिळुर, संख, उमदी, सिध्दनाथ व इतर भागातील बोअरवेल, म्हैशाळ योजनेतुन भरण्यात आलेले व पावसाने भरलेले तलाव यावर अत्यंत चिकाटीने व जिद्दीने आज शेतकरी वर्गाने डाळींब, द्राक्षपंढरी व बेदाणा पंढरी उभी केलेली आहे. 
Rate Cardज्या पश्चिम भागात थोड्या फार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.अशा काही ठिकाणी उत्कृष्ठ पध्दतीचा भाजीपाला पिकवून शेतीचे नवे विश्व जत तालुक्यात उभारण्यात आलेले आहे. असे असले तरी जत तालुक्यातील पश्चिम भागातील 40 ते 45 गावात म्हैशाळ च्या विस्तारीत योजने तील 6 व्या टप्प्याचे पाणी पोहोचले आहे. पण उर्वरीत 60 ते 70 गांवे ही अद्याप पाण्याकरीता तहानलेली व देशातील चार राज्यांची पाण्याची तहान भागविण्याऱ्या व शेतीसाठी वरदान असणाऱ्या कृष्णामाईसारख्या नदीच्या पाण्याच्या प्रतिक्षेत मागील तीन अनेस दशकापासून आहेत.त्याच बरोबरीने जत तालुक्यात कष्टकरी, मजुर व कामगार इत्यांदीचा प्रचंड असा वर्ग आजही तालुका सोडूून राज्यात व इतर राज्यात कामाकरीता स्थलांतरीत होतो आहे. स्वर्गीय राजारामबापू पाटील यांना सुध्दा जत तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसायचा होता.

आता तेच ध्येय घेऊन त्यांचे सुपुत्र ना.जयंत 

पाटील यांनी जत तालुक्याचा पाणी प्रश्न संपविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.त्या अनुषंगाने पुर्व भागातील गावांना दोन टिएमसी पाणी देण्यासाठी तुबची-बबलेश्वर योजनेच्या संदर्भात महाराष्ट्र कर्नाटकातील मंञ्याची बैठक घेत कारवाई सुरू करण्यात आली आहे.  दोन्ही राज्यांत करार होण्यासाठी समिती नेमण्याचे ठरले आहे. या योजमेमुळे जत तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरुपी संपणार आहे.त्याशिवाय स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पुर्ण होणार आहे,असेही शेवटी चव्हाण म्हणाले.

राष्ट्रवादी कॉग्रेस युवक जिल्हा अध्यक्ष अशोक कोळी, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस जत तालुका अध्यक्ष सतीश उर्फ पवन कोळी, हेमंत खाडे, जयंत भोसले, रमजान उर्फ बंटी नदाफ, सागर चंदनशिवे, राहुल बामणे, अमरसिंग मानेपाटील, मयुर माने, रुपेश पिसाळ व आदी राष्ट्रवादीचे सदस्य उपस्थितीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.