14 व 15 जुलै रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा ; सहाय्यक आयुक्त एस. के. माळी

0

सांगली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले आहे. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता असल्यामुळे काही अटी व शर्तींच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक आस्थापनांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार युवक-युवतींसाठी दिनांक 14 व 15 जुलै 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचा इच्छुक युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त एस. के. माळी यांनी केले आहे.


Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.