कर्मचारी व सेवकांमुळेच राजे रामराव महाविद्यालयाची समाजात प्रतिष्ठा: प्राचार्य ढेकळे

0

जत,प्रतिनिधी : महाविद्यालयाच्या कर्मचारी व सेवकांमुळेच समाजात व शैक्षणिक क्षेत्रात राजे रामराव महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढत आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ व्ही एस ढेकळे यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाकडे 40 वर्षे सेवा बजावणाऱ्या प्रयोगशाळा परिचर मारुती चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी प्रा श्रीमंत ठोंबरे, प्रा कुमार इंगळे, श्री मनु मोरे, राम शिंदे, गजानन कुंभार रियाज गंजिवाले, तुकाराम शिंगाडे, नामदेव खुडे यादी प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन बी के पुजारी यांनी केले.आभार अकाऊंट मनु मोरे यांनी मानले.हा कार्यक्रम निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत व शासनाने केलेल्या वैयक्तीक व सामाजिक अंतर नियमांचे पालन करुन आयोजित करण्यात आला होता.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.