जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बिळूर येथे कोरोना बाधित रुग्ण झपाट्याने आढळून येऊ लागल्याने त्यांची दहशत घेत माडग्याळ, शेगाव,डफळापूर बंद पाळण्यात येत आहे.मात्र बंदचा फायदा घेत विविध दुकानदारांनी आपली दुकाने अडमार्गाने सुरू ठेवत ग्राहकांची लुट सुरू केली आहे. किराणा,भूसारी,कृषी दुकानदारांनी मालाचे दर आव्वाच्या सव्वा वाढविले आहे.कृषी दुकानातील बियाणे,औषधे,खताचे दर शेतकऱ्यांचे पिळवणूक केली जात आहे. एकडीकडे शेतमालाचे दर उतरले असताना औषधे,खते,बियाणाचे दर वाढवून सुरू असलेली लूट भूमीपुत्र म्हणवून घेणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांच्या निर्देशनास येत नाही,हे विशेष.. साखर किलोमागे 7 रू,तेल किलोमागे 15-20 रूपये,इतर जीवनावश्यक मालाचे दर किलोमागे 5-20 रूपयापर्यत वाढविले आहेत. सीमेंट 100-150 रू,लोंखड,पत्रेसह अनेक वस्तूचे दर आवाक्याबाहेर वाढवित सामान्य नागरिकांना लुटण्याचा बंदने थेट परवाना दिल्याचा प्रकार समोर येत आहे.बंदसाठी पुढाकार घेणारे पदाधिकारीं,अधिकारी या लुटीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत.
सामान्य नागरिक भरडले
गेल्या चार महिन्यापासून कोरोनाचा कहर वाढल्याने सततच्या लॉकडाऊनचा फटका हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यासह सामान्य नागरिकांना बसला आहे.हातात पैसाची चणचण अचानक बंदमुळे अनेकांना जीवनावश्यक वस्तूही खरेदी करता आल्या नाहीत.परिणामी बंदमध्ये बंददारा आडून अशा वस्तू अव्वाच्या सव्वा दर वाढवून विकत आहेत.यांत सर्वाधिक सामान्य नागरिक भरडला जात आहे.
बंदबाबत शासनाचे आदेशाकडे दुर्लक्ष
जत तालुक्यातील गावागावतील बंदबाबत शासनाच्या आदेशाकडे गावातील पदाधिकारी, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात आहे.दुसरीकडे बंदचा लाभ ग्रामपंचायतीनी घेतला आहे.बेकायदेशीर कामे घुसडून लाखो रुपयाचा निधीचा गैरकारभार केले जात आहेत.याबाबत तालुका प्रशासनाकडून दुर्लक्ष या पदाधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे.