विजबिले माफ करा,अन्यथा तीव्र आंदोलन करू | वंचित बहुजन आघाडीचा इशारा
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील नागरिकांची घरगुती व शेतीपंपाची वीज बीले माफ करणेबाबत अन्यथा तिव्र आंदोलन करू,असा इशारा वचिंत बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. तसे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले.
निवेदवात म्हटले आहे की,शेतीपंपाची व घरगुती वीज ग्राहकांची वीज बीले सरसकट माफ करावीत.लॉकडाऊन काळामुळे सर्व जनता हैराण झाली आहे. नागरिकांना जीवण जगणे कठीण बनले आहे असे असताना प्रचंड रक्कमेची वीज बीले देऊन जनतेला मोठा शॉक दिला आहे.लॉकडाऊन काळामध्ये सर्वच उद्योग धंदे बंद होते,त्यामुळे लोकांच्या हाताला कामच नसल्यामुळे जीवन जगणे मुश्कील झाले असुन लोकांकडे पैसा नाही.त्यामुळे सरकारने सरसकट वीज बीले माफ करावीत. कोरोनाच्या महामारीमुळे लॉक डाऊन काळात सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील होऊन बसले असताना लोकांना काम धंदा नाही.अनेक जण नोकऱ्या सोडून घरात बसले आहेत. पैसा नाही,
उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे बंद झाले आहे. अशा परिस्थीती राज्य सरकारने व वीज वितरण कंपनीने ग्राहकांना घरगुती व शेतीपंपाची वीज बीले वाढवुन देऊन एक प्रकारचा शॉक दिला आहे. सदरची वीज बीले सामान्य ग्राहक भरु शकत नाहीत अशी स्थिती आहे. वीज वितरण कंपनीने या वीज बिलामध्ये वीज कर, इंधन कर,अधीभार अशी वेगवेगळी

शुल्क आकारणी केली असुन ग्राहकाचे कंबरडे मोडण्याचेच काम केले आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. सरासरी बिलाच्या कितीतरी जादा पटीने वीज बीले ग्राहकांना दिली आहे.कोरोना या महामारीमुळे लोकांना उपजिवीका करताना खुपच त्रास होत आहे.मात्र आर्थिक उत्पन्नाचे साधन सद्य स्थितीत अगदीच तुटपुंजी आहे.तर सामान्य वर्ग कसाबसा जीवन जगत आहे. अशातच जीवन जगणे कठीण झाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा वीज पाणी इतर सुविधा स्वत:साठी पुरवत असताना त्यांची दैना उडत आहे.मात्र या सर्व परिस्थीतीचा शासनाने गांभीर्यपुर्वक विचार करुन घरगुती वीज बीले व शेतीपंपाची वीज बीले माफ करावीत. यासाठी आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करावा, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल,असे वंचित बहुजन आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.