‘प्रहार’च्या जत तालुका अध्यक्षपदी सुनील बागडे, शहर युवक अध्यक्षपदी विकास राठोड
जत,प्रतिनिधी : प्रहार जनशक्ती संघटनेच्या जत तालुका अध्यक्षपदी सुनील बागडे तर शहराध्यक्षपदी विकास राठोड यांची निवड करण्यात आली. राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यमंत्री होण्यापूर्वी प्रहार जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे विविध प्रश्न सोडविले आहेत. या संघटनेच्या जत तालुक्यातील नव्याने नियुक्त केलेल्या
पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्र नुकतेच देण्यात आले आहे. निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी सुनील रास्ते, याकुब उमराणी, अभिषेक जमदाडे, दिग्विजय

पाटील, संपत कांबळे, ओंकार वरुटे, श्रीराम नांगरे पाटील, ऋषिकेष घोडे पाटील, प्रवीण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवडीनंतर तालुकाअध्यक्ष बागडे व राठोड म्हणाले की, प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी आमच्या निवडी करून तालुक्यातील नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली आहे.त्याबद्दल पाटील
यांचे आभारी आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांचा समाजसेवेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवेचा लाभ, तसेच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.