बिळूरमध्ये क्वॉरंटाईन मधील दोघे पॉझिटिव्ह | एकूण संख्या 60 वर
जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथे सोमवारी नव्या दोन पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली.बिळूरची एकूण आता 60 वर पोहचली आहे.पॉझिटिव्ह दोघे रुग्ण हे क्वॉरंटाईन मध्ये होते.
कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या बिळूरमध्ये कोरोना प्रभाव रोकण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
बिळूरमध्ये शाळेत संस्था क्वॉरंटाईन केलेल्या 22 जणांचे स्वाब घेतले होते.त्यांचा सोमवारी अहवाल आला आहे.त्यापैंकी जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यात लक्षणे आढळून येणाऱ्याचे स्वाब आरोग्य विभागाकडून तपासण्यात येत आहेत.त्या पार्श्वभूमीवर बिळूरमधील संशयित सुमारे 1185 जण क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत.435 संस्था क्वॉरंटाईन तर 750 जण होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत.
सोमवारी तपासण्यात आलेल्या रुग्णापैंकी फक्त दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने कांहीअंशी दिलासा मिळत आहे.तालुका आरोग्य विभागाकडून कसोशीने कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.बाधित रुग्णाच्या संपर्कातील सध्या आरोग्य यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे.