वीजबिलं आहेत की खंडण्या?, जनतेचा सवाल

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील लॉकडाऊन मुळे मोठा फटका बसलेल्या वीज ग्राहकांना महावितरणकडून वाढीव बिलाचे झटके दिले जात आहेत. त्यामुळे ग्राहक अडचणीत आले आहे. ‘वीज बिल माफी झालीच पाहिजे.’ अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतीसह सर्व व्यवसाय तोट्यात आल्याने  नागरिक आर्थिक अडचणीत आले आहेत. सर्वसामान्य आर्थिक अडचणीत आहेत.तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने वाढीव वीज बिल आकारणी करून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा भुर्दंड दिला आहे. वीज बिले आहेत कि खंडण्या? असा सवाल आता ग्राहकांकडून उपस्थित केला. 

सद्यस्थितीत कोरोनाचा जत तालुक्यात वाढत असल्याने रोजगार आणि व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. घटत चाललेले उत्पन्न यामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले सरसकट माफ करावीत,जेकेकरून सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे.असेही म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.