डफळापूर, वार्ताहर : जत तालुक्यातील बिळूरमधील कोरोना रुग्णांची संख्या 50 वर पोहोचली आहे. यामुळे खबरदारी म्हणून डफळापूर शहर आजपासून 9 जुलैपर्यंत बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संरपच बालिकाकी चव्हाण यांनी केली.
रविवार ता.5 जूलै ते गुरूवार ता.9 जूलैपर्यत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेण्यात येणार आहेत.त्यात रविवार 5 जूलै,ते मंगळवार 7 जूलै पर्यत तीन दिवस दुकाने बंद राहणार आहेत.बुधवार ता.8 ते गुरूवार 9 पर्यत काळात कृषी दुकाने 8 ते 2 पर्यत चालू राहतील.तर मेडिकल दुकाने 8 ते 2 पर्यत चालू राहणार आहे.