जत,प्रतिनिधी : भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी जिल्हा उद्योग केंद्र योजनेंतर्गत निम शहरी व ग्रामीण भागातील सुक्ष्म उद्योगांना अर्थ सहाय्य द्या, अशी मागणी जतचे आ. विक्रमसिंह सावंत यांनी मंत्री पाटील व मंत्री कदम यांच्याकडे केली आहे.
आ. सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जत विधानसभा मतदार संघामध्ये भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाची एकूण सुमारे 67 टक्के म्हणजेच एक लाख 21 हजार 660 इतकी लोकसंख्या असून तालुक्यामध्ये या समाजामध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड हे.यासाठी या जमातीतील लोकांना छोटे उद्योग, व्यवसाय करून उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे निम शहरी व ग्रामीण भागातील उद्योगांना डीपीडीसी योजने अंतर्गत अर्थसहाय्य मिळण्याची आवश्यकता आहे.तसेच महाराष्ट्र शासनानातर्फे भटक्या जमातीच्या धनगर प्रवर्गातील समाजासाठी केवळ चार योजना सुरू करण्यात येणार असून उर्वरीत शासन घोषित योजनांची अंमलबजावणी करावी,अशीही मागणी केली आहे.
धनगर प्रवर्गातील समाजासाठी एकूण 23 योजना करावयाच्या असून सदर योजना आदिवासी विकास मार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाज कासासाठी विशेष कार्यक्रम राबविणे घोषित झाले आहे. परंतु चार योजना सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. तरी उर्वरित सर्व योजना कार्यान्वित होणे आवश्यक आहे.