बेळोंडगीत तीव्र पाणी टंचाई | टँकर मागणी अडखली प्रशासनाच्या लालफीतीत

0

जत,प्रतिनिधी : बेळोंडगी ता.जत येथे गेल्या दोन महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे.दीड महिन्यापुर्वी ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव सादर करूनही टँकर पंचायत समिती,जत तहसील कार्यालयाच्या लालफीतीत आडकला आहे.परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या बेळोंडगी गावात भली मोठी भारत निर्माण पाणी योजना झाली आहे.ती इतर गावाप्रमाणे भानगडीतून बंद आहे.

गावाला पाणी पुरवठा करणारे सर्व स्रोत बंद पडल्याने गेल्या दोन महिन्यापासून गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.ग्रामपंचायतीने दीड महिन्यापुर्वी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात तलाठी,मंडलअधिकारी यांचा पाहणी अहवालही जोडण्यात आला आहे.पंचायत समितीकडून हा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.तेथे बेंळोडगी गाव टंचाई आराखड्यात नाही.म्हणून प्रस्ताव परत पंचायत समितीकडे पाठविण्यात आला. पंचायत समितीने ग्रामपंचायतीला टंचाई आराखड्यात गावाचा समावेश करावा म्हणून संख अप्पर तहसील कार्यालयाकडे पत्र पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार त्रुटी काढत पुन्हा तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यात टंचाई आराखड्यात समावेश करून टँकर मंजूर करावा असे गटविकास अधिकारी यांचे स्वंतत्र पत्र जोडण्यात आले.तरीही तहसील कार्यालयाकडून या प्रस्तावास मंजूरी देण्यात आलेली नाही.पुन्हा टंचाई आराखड्याचे कारण देत प्रस्ताव टाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आले आहे. सध्या बेळोंडगीत तीव्र पाणी ऊंचाई आहे.परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे.

Rate Card

तातडीने टँकर द्या : सोमलिंग बोरामणी

पंचायत समिती,तहसील कार्यालयाचा भोगळ कारभार असून मुळात टँकर मागणीच्या प्रस्तावास तलाठी,मंडल अधिकारी यांचा अहवाल जोडण्यात आला आहे.तरीही टंचाई आराखड्याचे कारण देत टँकर देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. प्रशासनाच्या भोगळ कारभारामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तातडीने टँकर द्यावा,अन्यथा घागरी आंदोलन करू,अशा इशारा सोसायटीचे चेअरमन सोमलिंग बोरामणी यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.