21 जणाचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह | संख परिसरातील नागरिकांना दिलासा ; सर्वत्र दक्षता

0

संख,वार्ताहर : संख प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावामध्ये बाहेरून आलेल्या 21 जणाचे शुक्रवारी कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे माहिती संख प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सुशांत बुरकुले यांनी दिली.

संखसह चार गावातील संशयित 21 लोकांचे स्वाब मिरज येथील कोवीड -19 रूग्णालयात चारदिवसापुर्वी तपासणीसाठी पाटविण्यात आले होते. अखेर शुक्रवारी संध्याकाळी या सर्वाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनाने निश्वास सोडला.

संख प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 17 गावापैंकी संख येथील -02,पांढरेवाडी – 07,दरीकोणूर -02, आसंगी (बाजार) -10 असे एकूण 21 जण कोरोना प्रभाव असलेल्या पुणे,मुंबई,ठाणे,रायगड या भागातून आले होते.खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने या 21 जणाची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला होता.या सर्वजणाचे कोरोना रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आले.दरम्यान संख प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची आम्ही काळजी घेत आहोत.बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची माहिती उपलब्ध करणे,त्यांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवणे,गावे स्वच्छ ठेवणे याबाबत दक्षता घेत आहोत.आतापर्यत सर्व गावात कोरोना रोकण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.नुकतेच बाहेर गावावरून आलेल्या 21 जणांचे खबरदारी म्हणून कोरोना तपासणी केली होती.सुदैवाने सर्वजणाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.यापुढेही आमचे केंद्राच्या अधिपत्याखालील गावावर निगरानी राहिल,असे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुंशात बुरकुले यांनी दिली.

Rate Card

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी बसवराज अवरादी,आरोग्यसेवक संतोष कोळी,आरोग्यसेविका,वाहन चालक तुराई उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.