जतेत चिनच्या हल्ल्याचा निषेध, चिनी वस्तूची होळी

जत,प्रतिनिधी : भारत-चीन सिमेवर चीनकडून अचानक हल्ला केला. भारतीय सैनिकांनी त्यांना चोख उत्तर दिले. त्यात 20 भारतीय शुर जवान शहीद झाले.त्यांना रिपाई जत शाखेच्या वतीने भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.त्याशिवाय चिनी वस्तूची होळी करण्यात आली. या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
चीन या देशाने लडाखच्या गलावान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर नियोजनबध्द जो भ्याड हल्ला व्यवस्थेमध्ये जी ढवळाढवळ करीत आहे. याचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांनी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे.
चीन या देशाची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताने सर्व मार्गाचा वापर केला पाहिजे.भारतातील15 कोटी लोक वापरत असलेल्या टिक-टॉक या चीनी व्हीडीओ अँपमुळे चीनला कोट्यावधी रुपयांचा फायदा होतो. हे रोखण्यासाठी चीन देशाने बनविलेल्या मालावर बंदी घालणे गरजेचे आहे. तसेच टिक-टॉक या अँपवर भारतात बंदी घालण्यात यावी.
भारताने चीन सोबत केलेले सर्व व्यापारी संबध रद्द करावेत. भारतातील सर्व चीनी बनावट मालावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) सांगली जिल्हा यांच्या वतीने तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी चिनी वस्तूची होळी करण्यात आली. त्याशिवाय भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रंध्दाजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे नारायण कामत,विकास साबळे, संजय विलास कांबळे,संजय देवनाळकर,दुर्गाप्पा ऐवळे, मातंग आघात सोमनाथ कांबळे,विनोद कांबळे, सुभाष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
जत : चिन हल्याचा निषेध करत,चिनीवस्तूची होळी करण्यात आली.