उमदी,वार्ताहर : आंतरराष्ट्रीय सिमेवर होणाऱ्या चोरटी दारू वाहतूक करणाऱ्या वाहन पकडत एक लाख चार हजार चारशे रुपयेची किंमतीची दारू व एक ट्रक असा एकूण आठ लाख पंधरा हजारचा मुद्देमाल उमदी पोलीसांनी जप्त केला.याप्रकरणी नेताजी तानाजी लवटे,रा तिर्हे ता.उत्तर सोलापूर या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याला माल विकणाऱ्या दारू दुकानदार निलेश कलाल यांचेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रवीवार ता.21 जून 2020 रोजी उमदी पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई करण्यात आली.