अंकलेत आणखीन एकजण कोरोना बाधित : एका दिवसात दोघे कोरोना पॉझिटिव्ह
डफळापूर :अंकले ता.जत येथे आणखीन एक 50 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. रवीवार एकाच दिवशी दोघाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून बाहेरून आलेल्या अंकलेतील सुमारे 35 जणांचे स्वाब तपासणीसाठी घेतले होते.त्यात या दोन व्यक्ति कोरोना बाधित आढळल्या आहेत.दोंघेही मुंबईतील कोरोना प्रभावित भागातून अंकलेत आले होते.

दोघाच्या जवळच्या संपर्कातील नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र एका 60 वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील मुलीचे कोरोना तपासणी झालेली नाही.तिच्यासह अन्य संपर्कातील लोकांची शोध घेण्यात येत,असल्याची माहिती डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित चौथे यांनी दिली.