जत,प्रतिनिधी : अंकले ता.जत येथे पुन्हा एका 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.या व्यक्तिचे कुंटुब कोरोना प्रभावित असलेल्या अंबरनाथ भागातून ता.9 जूनला अंकलेत आले आहेत.
दक्षता म्हणून तालुका प्रशासनाकडून बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांच्या तपासणीत हा रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.त्याला कोणतीही कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नव्हती मात्र स्वाब तपासणीत त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.सध्या बाधित व्यक्तीचे कुंटुब अंकले-बाज सिमेवर असणाऱ्या एका घरात होम क्वॉरंटाईनमध्ये वेगळे राहत आहे.
यापुर्वी अंकले येथे दोन रुग्ण सापडले होते.त्यांच्यावर मिरज कोविड रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. त्याचा उपचाराचा 14 दिवसाचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे. खबरदारी म्हणून सध्या त्यांना संस्था क्वारंनटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे.दरम्यान या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट येताच प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील, बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर,डॉ.अभिजित चौथे व आरोग्य विभागचे पथक अंकलेत पोहचले आहे.