चेकपोस्टवरील मनमानी कारभाराची चौकशी करावी
जत,प्रतिनिधी : उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्नाटक सीमेवरील नगर-विजयपूर महामार्गावरील कोंतेबोलाद येथील चेकपोस्टवरील मनमानी कारभाराची चौकशी करावी तसेच येथील अवैध धंद्याना पाठीशी घालून गुन्हेगारांना अभय देणाऱ्या उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी,अशी मागणी श्री.संत रोहिदास महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गृहमंत्री,पोलीस महासंचालक,पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्नाटक सीमेवर नगर-विजयपूर महामार्गावर कोतव बबलाद यथे चेकपोस्ट आहे.त्याठिकाणी उमदी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्याठिकाणी लॉकडाउन असताना मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील लोक ये जा करीत आहेत.याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूची,अवैध मालाची,हुबळीमेड दारू,गांजा,चंदनाची,वाहतूक येथूनच केली जाते.
तसेच या महामार्गावरून अवैध तस्करीही मोठ्या प्रमाणात होत आहे.चेकपोस्टवर खासगी लोकांची नेमणूक केली आहे. चीरीमीरी घेऊन या वाहतूकीला अभय देत औआहेत.त्यामुळे या परिसरात गुन्हेगारी वाढली आहे.कर्नाटकातील गुन्हेगार या भागात आश्रय घेत आहेत. त्यामुळे या मार्गावरुन दिवसाचा व रात्रीचा प्रवास धोक्याचा बनला आहे. तसेच या सर्व कारभाराची माहिती असूनही चेकपोस्टवरील मनमानीला पाठीशी घालणाऱ्या उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी श्री संत रोहिदास महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.