उमदी मावा फँक्टरीवर छापा | उमदी पोलीसाची कारवाई ; दोघा संशयितासह 53 हजाराचे साहित्य जप्त

0

उमदी,वार्ताहर :  उमदी ता.जत येथे मावा तयार करणाऱ्या फँक्टरीवर छापा टाकतल मावा तयार करण्याची मशीनसह 53 हजार 500 रूपयाचा मुद्देमालासह दोघां संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.यांसदर्भात दैनिक संकेत टाइम्सच्या मंगळवारच्या अंकात वस्तूनिष्ठ वृत्त प्रसिद्ध होताच पोलीसांनी कारवाई सुरू केली आहे.

उमदी पोलीस स्टेशन हद्दीत उमदी ते सलगरकडे जाणाऱ्या डांबरी रोडलगत सुमारे 2 किमी अंतरावर दक्षिणेस असलेले पत्रा शेडमध्ये बेकायदेशीररीत्या सुपारी तंबाखू व चुना यांचा वापर करून मशीनद्वारे मावा बनविला जात होता. 

Rate Card


त्याच्या छोट्या पुड्यामध्ये भरून तो गावोगावी विक्री केली जात असल्याची खात्रीशीर बातमी पोलीसांना मिळाली होती.त्या आधार या अड्ड्यावर छापा टाकला असता तेथे संशयित जाफर लालासाब मसले वय 31 वर्षे, हैदर महंमद अली टपाल वय 27 वर्षे (दोघे रा.उमदी रोड चडचण ता चडचण जि विजयपूर राज्य कर्नाटक) हे मशिनवर तयार केलेल्या माव्याच्या पुड्या भरताना आढळूंन आले.या छाप्या मध्ये मशिन,मावा तयार करण्याचे साहित्य असा एकूण 53,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करत संशयिताना ताब्यात घेतले आहे.

 सपोनि दत्तात्रय कोळेकर,पोलीस हवालदार सचिन आटपाडकर,पोलीस नाईक नितीन पलूसकर,पोलीस नाईक श्रीशैल वळसंग,पोलीस कॉ.प्रकाश रामगडे यांच्या पथकांने ही कारवाई केली.जप्त मुद्देमालची तपासणी कामी सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांच्याकडे पाठविला असून त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

अन्नभेसळची डोळेझाक कशासाठी

सांगली जिल्ह्यात अन्नभेसळ विभाग कागदावर कार्यरत असल्याचे समोर येत आहे. बंदी असणारे तंबाखूजन्य पदार्थ तालुकाभर खुलेआम विकले जात असतानाही अन्नभेसळचे अधिकारी हाताची घडी,तोंडावर बोट या दशेत आहेत.राज्य शासनाने पानपट्ट्या चालू करताना दिलेल्या नियमावली पायदळी तुडवत हे पानपट्टी चालक खुलेआम बेकायदेशीर गुटखा,मावा असे तंबाकूजन्य पदार्थ विकत आहेत.यामुळे गावागावातील चौक,कोपरे,सार्वजनिक परिसरात पिचकाऱ्या वाढल्या आहेत.यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नसल्याचे अन्नभेसळ विभागाला वाटत असल्याने त्यांच्याकडून या प्रकाराला खतपाणी घातले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.