जत शहरातील मागासवर्गीय बेघर कुंटुबांना घरकूल योजना | सभापती भूपेंद्र कांबळे यांची माहिती : कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

0

 

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत शहरातील मागासवर्गीय समाजातील बेघर कुंटुबियांना शासनाच्या माता रमाई घरकुल आवास योजनेतून प्रत्येकी दोन लाख पन्नास हजार रूपयाचा निधी देण्यात येणार आहे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे नगरपरिषदेकडे जमा करावीत,असे आवाहन शिक्षण,क्रिडा व सांस्कृतिक सभापती भूपेंद्र कांबळे यांनी केले. 

शहरात गेल्या आठ वर्षापासून दलित वस्तीसाठी घरकूल योजना नव्हती.ती मंजूर व्हावी यासाठी कृषी,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे जत शहरात माता रमाई घरकुल आवास योजना राबविण्यात येत आहे.

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, मातंग वस्ती, दुधाळ वस्ती, उमराणी रस्ता, विठ्ठल वाडी छत्रीबाग रोड, चर्मकार गल्ली, देवदासी काॅलनी वस्त्यांमधिल मागासवर्गीय समाजासाठी या योजनेचा लाभ होणार आहे. यात घर दुरूस्ती, बेघर असणार्‍या कुटुंबांना दोन लाख 50 हजार इतका घरकुल योजना निधी देण्यात येणार आहे.त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह नगरपरिषद,किंवा भूपेंद्र कांबळे संपर्क कार्यालयाशी संपर्क साधवा, तर लाभार्थ्यांनी याचा आवश्यक लाभ घ्यावा,असेही कांबळे म्हणाले. 

कांबळे म्हणाले,गेली अडीच वर्षे मी नगर सेवक,सभापती म्हणून काम करत असताना सुमारे दीड कोटी रूपयाचा निधी माझ्या प्रभागासाठी आणला आहे.त्यात पेव्हींग ब्लाॅक, काँक्रिटीकरण, मातंग समाज अंतर्गत गटारी, समाज मंदीर सुशोभीकरण, संभाजी चौक ते सी. बी.पवार हाॅस्पिटल भुयारी गटार, आदी विकास कामे पूर्ण झाली आहेत.

त्याशिवाय अन्य दोन कोटीचा निधी मंजूर झाला असून त्यातील कामांना लवकरचं सुरूवात होणार आहे. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान अंतर्गत पेव्हींग ब्लाॅक 58 लाख 30 हजार 890,सी.बी.पवार ते स्टेट बँक पर्यंत कॅनाॅल टाईप गटार करणे 71 लाख 81 हजार,आरळी कॉर्नर ते संभाजी चौक गटारी वर स्लॅब टाकणे, 13 लाख 22 हजार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम कंपाऊंड बांधकाम 38 लाख 729, दलित वस्ती अंतर्गत पेव्हींग ब्लाॅक बसविणे 13 लाख अशी कामे या निधीतून होणार आहे. येत्या महिन्याभरात सा कामांना सुरूवात केली जाणार आहे,असेही कांबळे यांनी सांगितले.

Attachments area

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.