पुर्व भागात लॉकडाऊन शिथिल होताच पिचकाऱ्या वाढल्या

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : पुर्व भागात लॉकडाऊन शिथिल होताच पिचकाऱ्या वाढल्या आहेत.पान पानटपऱ्यातील तंबाखूजन्य पदार्थामुळे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो,अशी भिती व्यक्त केली जात आहे.देशभरात कोरोनामुळे बंद असलेल्या पानटपऱ्या चौथ्या टप्यात लॉकडाऊन शिथिल होताच संखसह पुर्व भागातील गावागावातील पुन्हा चालु झाल्या आहेत.

या पानपट्ट्यातील बेकायदा गुटखा,मावा व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन गावागावात शौंकीनाच्या पिचकाऱ्या वाढल्याने धोका निर्माण झाला आहे.तंबाखूजन्य पदार्थामुळे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो,यामुळे पानटपऱ्यांना लवकर परवानगी देण्यात आल्या नव्हत्या.

मात्र चौथ्या टप्यात सुरू झालेल्या या पानपट्ट्यातून बंदी असलेला 6 रूपये किंमतीचा गुटखा 15,तंबाखू पुडी 12 रूपयांची 25 विक्री,तर मावा 20 रूपयाचा 50 रूपये अशा चारपट दराने विक्री होत असतानाही, शौकिनांचा प्रतिसाद कमी झालेला नाही.या तंबाखूजन्य पदार्थ खाऊन गावागावातील चौकाचौकात पिचकाऱ्यांने कोपरे रंगले जात आहे.तर दुसरीकडे अनेक पानपट्टी चालकांकडून सोशल डिस्टन्सिंग उल्लंघन होत आहे.याकडे अन्न,औषध प्रशासन व पोलीसांनी लक्ष घालावे,अशी मागणी ग्रामस्थानातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.