रस्ते कामात काळे आईल घालण्याचे प्रकार

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात लॉकडाऊन नंतर मंजूर रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे गतीने सुरू आहेत.पावस पडण्याअगोदर कामे पुर्ण करण्याची घाई बांधकाम विभागाला झाली आहे.यात कामाचा दर्जापुरता घसरला असून डांबरीकरणाच्या या कामात डांबरापेक्षा काळे आईल ओतून रस्ते केले जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढे काम चालू असताना पाठीमागे रस्ता उखडत असल्याची अनेक कामावरून स्पष्ट होत आहे.

तालुक्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे मंजूर झाली आहेत.त्यांचे टेंडर प्रक्रिया पुर्ण करून कामास कार्यारंभ करण्यात आले होते.मात्र कोरोना मुळे लॉकडाऊन झाल्याने ही कामे रखडली होती.गेल्या महिन्यापासून जतच्या बांधकामच्या दोन्ही विभागाकडून ही कामे गतीने करण्याचा घाट घालण्यात आला आहे.या आदेशाचा ठेकेदारांकडून सोयीचा अर्थ काढत दर्जाहीन कामे केली जात आहेत.

कार्यालय बसून टक्केवारी मिळविण्यात मशगूल असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा याला थेट पांठिबा मिळत असल्याने नियम धाब्यावर बसवून रस्ते पुर्ण केले जात  आहेत.रोलींग,खडीकरण,डांबरीकरणात दर्जाच उरला नसल्याने येणाऱ्या पावसाळ्यातच हे रस्ते पुन्हा उखडणार हे निश्चित आहे.

अनेक अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या मुदती संपूनही जतेत ठिय्या

जत बांधकाम विभागाच्या दोन्ही विभागात नेमणूकीस असणाऱ्या काही अधिकारी,कर्मचाऱ्यांची शासकीय मुदत संपूनही त्यांची अद्याप बदली झालेली नाही.त्याचे अनेक ठेकेदाराशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले आहेत.टक्केवारीच्या या संबधात कामे कशीही केली,तरी त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.