मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली थांबवा

0

जत,प्रतिनिधी : जिल्हाधिकारी यांनी मायक्रो फायनान्स कंपन्याच्या हप्ते वसूलीस स्थगिती दिली आहे. तरीही फायनान्स कंपन्यांकडून सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहे. दररोज शेकडो महिलांना एकत्र करून या कंपन्या कर्ज वसुली करत असल्याने या कंपन्यांची वसुली काही काळापुरती थांबविण्याची मागणी

वचिंत बहुजन आघाडी जत शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.

Rate Card

तसे निवेदन जत तहसील,पोलीस व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश दिले असतानाही मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी तालुक्यात महिलांना एकत्रित करून सक्तीची वसुली करीत आहेत.

 या मायक्रो फायनान्स कंपनीच्या सक्तीमुळे महिला एकत्रित येत आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार होऊन विषाणू संसर्गबाधित रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.कोरोना रोगाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी ग्रामीण भागातील मजूर वर्गाला मजुरी मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न मजूर वर्गाला पडला आहे. त्यात या मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्मचारी धाकदपट करून सक्तीची वसुली करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्ग प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे. आपण या मायक्रो फायनान्स कंपन्यांना काही काळापुरती वसुली थांबविण्याचे आदेश देण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

नागरिक अडचणीत असल्याने वसूली थांबवावी
जत तालुक्यात कोरोना मुळे रोजगार थांबला आहे.त्यामुळे मध्यमवर्गीय नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यात हे हप्ते द्यायचे कसे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे या मायक्रो फायनान्स कंपन्याची वसूली पुढील काही महिने थांबवावी,अशी मागणी वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल साबळे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.