जत मधिल बाधित रुग्णाची आई कोरोना पॉझिटिव्ह
जत,प्रतिनिधी : जत शहरातील सैनिकनगर येथील कोरोनाबाधित ट्रँव्हल चालकांच्या संपर्कातील त्यांच्या 50 वर्षीय आईचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.
खलाटी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने ट्रँव्हल चालक कोरोना बाधित झाला होता.त्यावेळी तब्बल 28 जणांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवले आहे. तर सहा जणाचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.

त्यापैंकी कोरोना बाधित रुग्णाच्या आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्या महिलेवर मिरज येथील शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जत शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.सैनिक नगर सील करण्यात आले आहे. त्या भागाला कंटेन्टमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे पथक तपासणी करत आहे.