जत तालुक्यातील पहिला बळी | आंवढीतील एकजणांसह जिल्ह्यात कोरोना बाधित दोघाचा मुत्यू ; 92 रूग्ण कोरोनामुक्त

0

सांगली :  सांगली जिल्ह्यात आज दुपारी 3 वाजेपर्यंत 19 रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आजतागायत एकूण 167 रुग्ण कोरोनाबाधित ठरले असून यापैकी 92 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर उपचाराखालील 68 रूग्ण आहेत.तसेच एकूण सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचाराखाली असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी चार रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

आज कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये शिराळा तालुक्यातील सोनवडे येथील 28 वर्षाचा युवक, मणदूर येथील 13 व्यक्ती (8 पुरूष व 5 स्त्री), तासगाव तालुक्यातील पेड येथील 35 वर्षाचा युवक व वायफळे येथील 52 वर्षाचा युवक, कवठेमहांकाळ तालुक्यातील  कदमवाडी येथील 38 वर्षाची स्त्री, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षाचा युवक, कोरेनगर (इस्लामपूर) येथील 33 वर्षाची स्त्री, अशा एकूण 19 व्यक्ती कोरोना बाधीत झाल्या आहेत. आजअखेर ग्रामीण भागातील पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या 123 असून शहरी भागातील 33 तर महानगरपालिका क्षेत्रातील पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या 11 इतकी आहे.

औंढी (जत) येथील 55 वर्षाचा पुरूष इन्व्हेजीव व्हेंन्टिलेटरवर ठेवण्यात आला होता त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मणदूर येथील 80 वर्षाचा रूग्ण दि. 5 जून रोजी अत्यवस्थ अवस्थेत दाखल झाला होता. त्यांचे सॅम्पल घेऊन आयसीयूमध्ये त्वरीत उपचार सुरू केले तथापी दि. 6 जून रोजी त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. दि. 6 जून रोजी रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला.

Rate Card

पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील 60 वर्षाचा रूग्ण नॉनइन्व्हेजीव व्हेंन्टिलेटरवर ठेवण्यात आला आहे. कडेबिसरी (सांगोला, सोलापूर) येथील 48 वर्षाच्या पुरूष रूग्णाला अजून ऑक्सिजनवर उपचार सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. खिरवडे (शिराळा) येथील 56 वर्षाच्या पुरूष रूग्णावर सद्यस्थितीत नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटर उपचार अद्याप सुरूच असून रूग्णाची स्थिती स्थीर आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील 50 वर्षाची महिला नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आली असून स्थिती स्थीर आहे. मणदुर (शिराळा) येथील 81 वर्षाच्या पुरूष रूग्णास नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला असून रूग्णाची स्थिती स्थीर आहे. विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षाचा आज पॉझिटीव्ह आलेला पुरूष अत्यवस्थ आहे.

आज 5 रूग्ण कोरोना मुक्त झाले असून यामध्ये चांदोली वसाहत (वाळवा) येथील 22 वर्षाचा पुरूष, करंजे (खानापूर) येथील 30 वर्षाचा पुरूष, आंबेगांव (कडेगाव) येथील 12 वर्षाची मुलगी व 9 वर्षाचा मुलगा व मणदूर (शिराळा) येथील 21 वर्षाचा पुरूष, अशा 5 व्यक्ती आज कोरोनामुक्त झाल्या आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.