जिल्ह्यात कोरोना बाधित दोघाचा मुत्यू | आंवढीतील 55 वर्षीय व्यक्ती तर शिराळ्यातील मणदूरचा एकजणाचा समावेश

0

आंवढी,वार्ताहर : आंवढी ता.जत येथील कोरोना बाधित 55 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मुत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.सांगलीत कोरोनामुळे रविवारी दोघांचा बळी गेला आहे.शिराळ्याच्या मणदूर आणि जत मधील औंढी येथील एकाचा यात समावेश आहे.

रविवारी दुपार पर्यंत तब्बल 19 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.तर 5 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 68 तर आतापर्यंत 167 रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईहून आलेला आंवढीतील कोरोना बाधित

Rate Card

 या व्यक्तीचा आठ दिवसापुर्वी कोराना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यांना तातडीने मिरज येेेेथील कोविड सेंटर येथे हलविण्यात आले होते.तेव्हापासून त्याची प्रकृत्ती खालावली होती.गेल्या अनेक दिवसापासून त्यांना इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला आहे.रवीवारी त्यांचा उपचारादरम्यान मुत्यू झाला आहे.

जत तालुक्यातील हा पहिला कोरोनामुळे मुत्यू झालेला व्यक्ती आहे.जिल्ह्यातील सहावा रुग्ण आहे.आंवढीतील अजून कोरोना बाधित तिघे उपचार घेत आहेत. 

आंवढीला तहसीलदार सचिन पाटील यांनी तातडीने भेट देत पुढील उपाययोजना बाबत ग्रामपंचायतीला सुचना दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.